गिरिराज सिंह यांना इटलीचे राजदूत बनवा; राजदचे प्रवक्ते झा यांनी डागली तोफ

पाटणा – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना आपल्या मंत्रालयात स्वारस्य नाही. मात्र त्यांना इटलीबद्दल भरपूर माहिती दिसते आहे. त्यांचे इटायलीयन भाषेतले ट्‌वीट आपण आजच वाचले. त्यांना सरकारने इटलीचे राजदूत म्हणूनच नियुक्त करावे अशी आपली सरकारला विनंती असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता मनोज झा यांनी म्हटले आहे. गिरिराज यांनी राहुल गांधी यांना उद्देशून एकापाठोपाठ एक केलेल्या ट्‌वीटबद्दलही झा यांनी संताप व्यक्त केला.

गिरिराज यांना इटलीबद्दल असलेली माहिती भारत आणि इटलीदरम्याने संबंध सुधारण्यास अधिक फायदेशीर ठरेल असा टोलाही झा यांनी लगावला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पद्दुचेरीतील मासेमारांशी संवाद साधला होता. त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे केले असल्याचे ते म्हणाले होते.

तसेच तुमच्याशी (मासेमारांशी) बोलताना मी शेतकऱ्यांबद्दल का बोलतो आहे, असा प्रश्‍न तुम्हाला पडेल. पण आपण मासेमारांना सागराचे शेतकरी मानतो आणि शेतकऱ्यांप्रमाणे त्यांच्यासाठीही एक स्वतंत्र मंत्रालय असायला हवे अशी आली मागणी असल्याचे राहुल म्हणाले होते.

त्यांच्या या विधानावरून गिरिराज यांनी राहुल यांना लक्ष्य केले होते. राहुलजी इटलीत मत्सविभागाशी संबंधित वेगळे आणि स्वतंत्र असे कोणतेही मंत्रालय नाही. तेथे हा विभागही कृषी आणि वन विभागाच्या अंतर्गतच येतो. आपण मत्स मंत्रालयात यावे अथवा आपण बोलवाल तेथे मी येतो. पद्दुचेरीसह देशभरातील मासेमारांसाठी आमचे मंत्रालय कोठे काय काम करते आहे, त्याची मी आपल्याला माहिती देतो. अशा शब्दांत त्यांनी राहुल यांना लक्ष्य केले होते.

दरम्यान, गिरिराज सिंह यांच्या ट्‌वीटवर कॉंग्रेस अथवा राहुल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येण्याच्या अगोदरच राजदचेच प्रवक्ते त्यांच्यावर भडकले आहेत आणि गिरिराज यांना इटलीची खूप माहिती असल्यामुळे त्यांना त्या देशातील भारताचे राजदूत नियुक्त करून टाकावे असा सल्लाच त्यांनी पंतप्रधानांना दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.