-->

काॅंग्रेस पक्ष अडचणीत! कोणताही दोष नसताना राहुल गांधी बनले टीकेचे धनी

पुद्दुचेरी – कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आले होते व यावेळी त्यांनी मासेमारांसह काही नागरिकांशी संवाद साधला. नेमके तेव्हाच घडलेल्या एका प्रसंगामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून राहुल यांचा यात कोणताही दोष नसताना त्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले आहे.

राहुल नागरिकांशी संवाद साधत असताना एक ज्येष्ठ महिला त्यांच्याजवळ आली आणि तिने राहुल गांधी यांच्याशी तेलगु भाषेत संवाद साधण्यास सुरूवात केली. मात्र राहुल यांना ती भाषा अवगत नसल्यामुळे ती महिला काय बोलते आहे हे त्यांना समजण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यावेळी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी तेथेच राहुल यांच्याजवळ उभे होते. त्यांना राहुल यांनी त्या महिलेला काय म्हणायचे आहे, असे विचारल्यावर नारायणसामी यांनी दिलेले उत्तरच कॉंग्रेसला अडचणीचे ठरले आहे.

काही दिवसांपूर्वी या भागाला चक्रिवादळाचा तडाखा बसला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ना आमच्या भागाला भेट दिली ना कोणती मदत केली असे त्या महिलेने म्हटले होते व थेट राहुल यांच्याकडेच तक्रार केली होती. मात्र महिला ज्याच्याविषयी तक्रार करत होती ते मुख्यमंत्री शेजारीच उभे होते व त्या तक्रारीचे भाषांतर करून ते राहुल यांना सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आली.

मात्र त्यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत आणि आपले कौशल्या पणाला लावत संबंधित महिला आपली (नारायणसामी) तारीफ करते आहे. निवार वादळ आले तेव्हा मी त्यांच्या भागात गेलो होतो व त्यांची मदत केली असे ती सांगत असल्याचे त्यांनी राहुल यांना सांगितले.

नारायणसामी यांचा हा गोलमाल मात्र कॅमेऱ्यात टिपला गेला असून त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विरोधी पक्ष विशेषत: भारतीय जनता पार्टीने यांचे चांगलेच भांडवल केले आहे. कॉंग्रेसचे नेते खोटे बोलण्यात राहुल गांधी यांच्याशीच स्पर्धा करत असल्याची टिप्पणी भाजपने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.