Rohit Pawar on Rituraj Gaikwad : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. याआधी चेन्नई सुपर किंग्जने संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल केला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.यानंतर ऋतुराजवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील ऋतुराजला खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. | Rohit Pawar on Rituraj Gaikwad
रोहित पवार यांनी ऋतुराजसाठी ट्विट केलं आहे.आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मागील वर्षाच्या #MPL मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याची यंदाच्या IPL मध्ये ‘चेन्नई सुपर किंग्ज’चा कॅप्टन म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा !”
रोहित पवार पुढे म्हणतात,”माझा फेवरेट कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या जागी ऋतुराजची निवड झाल्याचं काही प्रमाणात दुःख असलं तरी ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या एका मराठमोळ्या खेळाडूला ही संधी मिळाली, याचा अधिक आनंद वाटतो.” | Rohit Pawar on Rituraj Gaikwad
मागील वर्षाच्या #MPL मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याची यंदाच्या #IPL मध्ये ‘चेन्नई सुपर किंग्ज’चा कॅप्टन म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा! माझा फेवरेट कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या जागी ऋतुराजची निवड… pic.twitter.com/qpvnQYg5I5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
ऋतुराजची आयपीएल कामगिरी…
ऋतुराजची आयपीएल कामगिरी बघितली तर ती चांगली झाली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 52 सामन्यांमध्ये 1हजार 797 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. ऋतुराजची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 101 धावा आहे. गेल्या मोसमात त्याने 16 सामन्यात 590 धावा केल्या होत्या. ऋतुराजची या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या 92 धावा होती. चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात या युवा खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऋतुराजने 2020 मध्ये पहिल्यांदा आयपीएल सामना खेळला. त्याला या मोसमात 6 सामने खेळण्याची संधी मिळाली. | Rohit Pawar on Rituraj Gaikwad