रितेशला माझा पती म्हणविण्याची इच्छा नाही; राखीचा खुलासा 

ड्रामा क्‍वीन राखी सावंत अनेक दिवसांपासून तिच्या सिक्रेट लग्नाविविषयी चर्चेत आहे. तिच्या पतीदेवाच्या नावाशिवाय कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामुळे चाहत्यांना राखीचे लग्न झाले आहे कि नाही अशी शंका आहे. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः राखीनेच दिले आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राखीने सांगितले कि, रितेशला प्रसिद्धीझोतात येण्याची इच्छा नाही. त्याच्यानुसार, सेलिब्रिटींना सातत्याने ट्रोल केले जाते. तुला (राखी) किती ट्रोल केले जाते. तसेच कोणी मला राखी सावंतचा नवरा म्हणून ओळखावे अशी माझी इच्छा नाही. माझी स्वतःची अशी ओळख आहे. सलमान खानने आम्हाला बिग बॉसच्या घरात बोलवले होते. परंतु, रितेशला प्रसिद्धीझोतात येणे आवडत नसल्याने आम्ही दोघांनीही बिग बॉसच्या घरात न जाण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी सावंतने २८ जुलैला मुंबईतल्या जे.डब्लू मेरियटमध्ये एका एनआरआयबरोबर गुपचूप लग्न केल्याची बातमीही अशीच पसरली होती. या बातमीस तिने स्वता:नेही दुजोरा दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत ‘मुद्दा ३७० एंड’ हा चित्रपट दिग्दर्शित करत असून या चित्रपटाची शुटिंगही सुरु झाले आहे. यामध्ये राखी एका पाकिस्तानी तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.