मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने या वर्षात लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिले आहेत. केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 त्यानंतर आता आगामी गुडन्यूज चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटांनंतर आता अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ट्विटरवर त्याने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. दुर्गावती असे त्या चित्रपटाचे नाव आहे.
EXCITED to announce @bhumipednekar in & as #DURGAVATI. A scary-thriller, going on floor mid-January. Presented by #CapeOfGoodFilms and @itsBhushanKumar, produced by @vikramix and directed by Ashok. Need your love and luck ? @TSeries @Abundantia_Ent pic.twitter.com/VsOpXFN6YG
— Akshay Kumar (@akshaykumar) November 30, 2019
अशोक दिग्दर्शित दुर्गावती हा एक भयपट असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर लीड रोलमध्ये झळकणार आहे. दरम्यान अक्षयने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये भूमी, भूषण कुमार, दिग्दर्शक अशोक, निर्माते विक्रम मल्होत्रा आणि अक्षय यांनी हातात कार्ड घेऊन फोटो काढला आहे. दरम्यान, या चित्रपटात भूमीची भूमिका कशी असणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.