टिक-टॉक बंद झाल्याने रितेशला आर्थिक फटका

बॉलीवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स संख्या प्रचंड आहेत. विशेषतः त्याच्या मजेदार रोल्समुळे चाहते आनंदी होतात, जे तो अनेकदा इन्स्टाग्रामवर शेअर करतो. जेव्हा भारतामध्ये टिक-टॉकचा ट्रेंड होता, तेव्हा रितेश अनेकदा त्यावर आपले व्हिडिओ शेअर करत असे. 

परंतु टिकटॉक बंद झाल्याने रितेश देशमुखला आर्थिक फटका बसला आहे. एका मुलाखतीत रितेश देशमुख म्हणाला, टिक-टॉकवर व्हिडिओ बनविण्याची सुरुवात लॉकडाऊनदरम्यान झाली होती.

हा तो काळ होता, जेव्हा प्रत्येकजण कठीण काळातून जात होता. मग, आम्हाला वाटले आपण त्यांना हसण्याचे काहीसे निमित्त देऊ. जेव्हा टिक-टॉकवर बंदी घालण्यात आली तेव्हा त्याला वाटले की, तो बेरोजगार झाला आहे.

मग इन्स्टा रील आले. मी म्हणालो चला, रील आले बरं झाले. तथापि, हेदेखील खरं आहे की, रितेश स्वतः टिकटॉकवरून पैसे कमवत होता आणि ते बंद झाल्यानंतर, त्यातून कमाईवर नक्कीच परिणाम झाला असेल. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास रितेश देशमुख आगामी “काकुडा’ या चित्रपटात दिसणार आहे.

हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यात रितेशसह सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम देखील मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय, जेनेलियासोबत “लेडीज व्हर्सेस जेंटलमन’ हा शो तो करत आहे. या शोचा हा दुसरा सीझन आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.