सामंथाने नाकारली शाहरुख खानची ऑफर

दक्षिणात्य अभिनेत्री सामंथा सध्या जोमात आहे. तिचे दोन सिनेमे दोन भाषांमध्ये एकापाठोपाठ एक येत आहेत. याशिवाय शाहरुख खानच्या “लायन’ची ऑफरही तिला देण्यात आली होती. मात्र, सामंथाने ही ऑफर नाकारली आहे, असे समजते आहे. 

तिच्याकडे नागा चैतन्यकरवी एक गोड बातमी लवकरच असणार आहे. काही दिवसांपूर्वीच सामंथा आणि नागा चैतन्य या दोघांनी विभक्‍त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र, तिला नागा चैतन्यचे बाळ हवे आहे. त्यासाठीच तिने “शकुंतलम’च्या निर्मात्यांनाही शूटिंग लवकर संपवण्याची विनंती केली आहे. 

या सिनेमाचे शूटिंग जास्तीत जास्त जुलै, ऑगस्टपर्यंत संपवण्याच्या अटीवरच तिने हा सिनेमा स्वीकारला होता. आता आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करण्यासाठीच तिने शाहरुख खानबरोबरच्या “लायन’ची ऑफर नाकारली आहे. “लायन’च्या निर्मात्यांकडून अथवा सामंथाकडून कोणीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

त्यामुळे हा सिनेमा आता आणखीन एक दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराला मिळाला आहे. नयनतारा सध्या मुंबईतच एका सिनेमाचे शूटिंग करते आहे. शाहरुखच्या “लायन’चे शूटिंग इतक्‍यात सुरू होण्याची शक्‍यता नाही. आर्यन खान प्रकरण संपेपर्यंत शाहरुखच्या “पठाण’चेही शूटिंग पूर्ण होऊ शकणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.