नवी दिल्ली – ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची नियुक्ती झाली असली, तरी भारतातील सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू आशिष नेहराला शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.
सोशल मीडियावरच्या पोस्टमद्ये अनेक नेटिझन्सनी ऋषी सुनक यांच्या ऐवजी आशिष नेहराचा फोटो पोस्ट केला आहे. दोघांच्या चेहऱ्यामध्ये साधर्म्य असल्यामुळे हा घोळ झाला असल्याचे सांगण्यात येते आहे.
काही जणांनी तर या गैरसमजूतीला पुढे तसेच कायम ठेवून काही मजेशीर मीम्स तयार केली आहेत. काही नेटिझन्सनी आशिष नेहराला टॅग करून ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन देखील केले आहे.
2003 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरोधात 6 विकट घेण्यापासून ते ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास अतुलनीय होता, असे एका नेटिझनने आपल्या मीममध्ये म्हटले आहे. या मीममध्ये सुनक आणि नेहरा या दोघांचे फोटोही पोस्ट केले गेले आहेत. सुनक यांचे अभिनंदन करताना नेटिझन्सनी इंटरनेटवर मनोरंजन देखील केले आहे.