ब्रिटन – प्रसिद्ध व्यक्तींची विधाने सामान्यांसाठी चर्चेचा विषय बनतात. असाच काहीसा प्रकार भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या सोबत घडला आहे. अनेकदा राजकीय गादी सांभाळणारे नेते त्यांच्या विधानांमुळे वादात सापडतात. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे अलीकडेच लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका भाषणात लैंगिक भेदभावावर आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता LGBTQ समुदायातून तीव्र विरोध होत आहे. अशात आता या प्रकरणाला कितपत गती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेत त्यांच्या भाषणात लिंगभेदावर विधान केले. यावर आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले, ”पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते, हीच ‘कॉमन सेन्स’ आहे. या वक्तव्यानंतर ट्रान्सजेंडर हक्क कार्यकर्त्यांकडून सुनक यांच्यावर टीका होत आहे. सुनक यांच्या भाषणादरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या कार्यक्रमातील उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.”
काय म्हणाले ऋषी सुनक?
या भाषणात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले, “लोक कोणत्याही लिंगाचे असू शकतात, लिंग व्यतिरिक्त (स्त्री आणि पुरुष व्यतिरिक्त) यावर विश्वास ठेवण्यास आम्हाला भाग पाडले जाऊ नये. पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते. ही अक्कल आहे.” ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेत लैंगिक भेदभावावर केलेल्या टिप्पण्यांना काहींचा पाठिंबा मिळाला, परंतु ट्रान्सजेंडर समुदायाने या टिप्पण्यांवर नाराजी व्यक्त केली. यावरून आता राजकारण तापले आहे.