कन्नड चित्रपट ‘कंतारा’ 30 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. त्याच वेळी, हा चित्रपट आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. दक्षिणेतील बडे स्टार्सही ‘कंतारा’चे जोरदार कौतुक करत आहेत.
अलीकडेच साऊथचा सुपरस्टार राणा डग्गुबती यानेही ‘कंतारा बॉक्स ऑफिस कलेक्शन’चे कौतुक केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी लिहिले, “कन्नडचा ऋषभ शेट्टी आग है, किती विलक्षण चित्रपट कांतारा. या चित्रपटाचा भाग असलेल्या सर्वांचे अभिनंदन.”
16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 70 कोटींची कमाई केली आहे. अशात, या चित्रपटाचे हिंदी आणि तेलुगू व्हर्जन रिलीज झाल्याने कमाईचा आकडाही वाढू शकतो. ऋषभ शेट्टीच्या ‘कंतारा’ या चित्रपटाची कमाई पाहता हा चित्रपट काही दिवसांतच १०० कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.