मुंबई – रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले. त्यामुळे सलग सातव्या दिवशी शेअर निर्देशांकांत वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 326 अंकांनी म्हणजे 0.81 टक्क्यांनी वाढून 40,509 अंकांवर बंद करा. विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 79 अंकांनी वाढून 11,914 अंकांवर बंद झाला.