सोलापूर – सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात रिंकूने दहावीपेक्षा तब्बल १६ टक्के अधिक मिळवत तब्बल ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा गुरुवार, दि. 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सैराट फेम आर्ची उर्फ रिंकू तथा प्रेरणा महादेव राजगुरू हि टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार होती. त्यामुळे अर्चिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी होण्याची परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. आर्ची हि या परीक्षा केंद्रावर बहिःस्थ विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झाली होती. मराठी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाचे पेपर रिंकूने प्राविण्य मिळवत ८२ टक्के गुण मिळवले आहे.