#ICCWorldCup2019 : विजयी मार्गावर परतण्याची भारताला संधी

विश्‍वचषकापुर्वी बांगलादेश विरुद्ध सराव सामना

स्थळ – सोफिया गार्डन मैदान, कार्डीफ
वेळ – दु. 3.00 वा

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी सुरू असलेल्या सराव सामन्यांमधील पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल अणेक प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असताना या सर्व प्रश्‍नांना आपल्या कामगिरीने उत्तर देण्याची संधी आज भारतीय संघासमोर असुन आजच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करुन विश्‍वचषक स्पर्धेला विजयी मनोधैर्याने सामोरे जाण्याची संधी भारतीय संघासमोर असनार आहे.

भारत आणि न्युझीलंड दरम्यान झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाचा तब्बल 6 गडी राखुन पराभव करत न्युझीलंडने विश्‍वचषक स्पर्धेसाठी सकारात्मक सुरूवात केली आहे. यावेळी दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाला विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी आपल्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना आजमावून पाहाण्याची ही अखेरची संधी असणार आहे.

यावेळी गत सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या विजय शंकरला याही सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. कारण त्याची दुखापत मोठी नसली तरी अद्याप तो पुर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. त्यातच केदार जाधव देखील पहिल्या सामन्यासाठी पुर्णपने तंदुरूस्त नव्हता त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही. तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही या बाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्याच्या सहभागा बद्दल अजुन कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

त्यातच पहिल्या सामन्यात भारतीय संघ न्युझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर पुरता कोलमडला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघातील प्रमुख फलंदाज वेगवान आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सामना कशा प्रकारे करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यातील संघातील प्रतमुख फलंदाज रोहित शर्मा (2), शिखर धवन (2) आणि लोकेश राहुल (6) हे तीनही फलंदाज एकेरी धावसंख्या करुन परतले.

यावेळी लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर उतरवून या क्रमांकावरील फलंदाजाचा शोध संपविण्यसाठी भारतीय संघ प्रयत्नशील होता. मात्र, त्याला केवळ सहा धावांचीच खेळी करता आल्याने भारतीय संघामध्ये पुन्हा तो या स्थानासाठी योग्य आहे की अयोग्य या विषयी चर्चा सुरू असली तरी आजच्याही सामन्यात त्याला चौथ्या स्थानी उतरविले जाण्याची शक्‍यता आहे. कारण, चौथ्या स्थानासाठी पर्यायी फलंदाज म्हणुन संघाकडे असलेला विजय शंकर जायबंदी आहे. त्यामुळे राहुलला आजच्या संधी सोणे करावे लागणार आहे.

त्याच बरोबर बांगलादेशचा पहिला सराव सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिल्याने त्यांच्यासमोर विश्‍वचषकापुर्वी संघातील खेळाडूंची क्षमतातपासुन पाहाण्याची ही अखेरची संधी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ते आपल्या संपुर्ण क्षमतेने उतरुन भारतीय संघावर दबाव वाढविण्यास प्रयत्नशील असतील.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पांड्या, रविंद्र जेडेजा आणि मोहम्मद शमी.

बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), अबु जायेद, लिटोन दास, महमदुल्लाह, मेहेंदी हसन, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्दक हुसैन, मुश्‍फिकुर रहिम, मुस्तफिझुर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रेहमान, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, तमिम इक्‍बाल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)