रावणगाव – खडकी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 3) राष्ट्रीय बालिका दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलतेय’च्या माध्यमातून सावित्रीबाईंचा जीवनप्रवास उलगडला, तसेच त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांकडे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वरी गुणवरे ही विद्यार्थिनी होती.
श्रृती जाधव या विद्यार्थिनीने प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका अमिना सय्यद, शिक्षक विद्या जगताप, वर्षा कांबळे, सारीका जाधव, कौशल्या वणवे, अनिल गायकवाड, गजेंद्र गायकवाड, सुरेश वाळके, प्रतापराव माने, राहुल बनसोडे, शिवकांत अडसूळ, प्रकाश बनसुडे यांनी परिश्रम घेतले.