भारतातील चाईल्ड पॉर्नविषयीची धक्‍कादायक माहिती उघड

गेल्या पाच महिन्यात 25 हजार व्हीडिओ सोशलमीडियावर अपलोड

नवी दिल्ली : भारतात पॉर्न साईटसंबंधी एक धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यात गेल्या पाच महिन्यात भारतातील चाईल्ड पॉर्नविषयीची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली आहे. अमेरिकेने भारतासोबत रिपोर्ट शेअर केला असून भारतात गेल्या पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नशी संबंधित 25 हजार मटेरिअल वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या नॅशनन सेंटर फॉर मिसिंग ऍण्ड एक्‍स्प्लॉयटेड चिल्ड्रनने (NCMEC) भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे सोपवली आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये गतवर्षी हा डेटा शेअर करण्यासंबंधी करार झाला होता.

गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राला या संबंधी माहिती दिली. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गोष्टी अपलोड करण्याच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि इतर राज्यांचाही या यादीत समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. अधिकाऱ्याने प्रत्येक राज्याची स्वतंत्र आकडेवारी देण्यास नकार दिला आहे. मात्र एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अशा 1700 प्रकरणांना सायबर युनिटकडे सोपवण्यात आले आहे.

गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आले असून देशभरात अनेक ठिकाणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, आम्ही कारवाईसाठी ऑपरेशन ब्लॅकफेस असा कोड तयार केला आहे. अशा पद्धतीचा डेटा सोपवण्यात आल्याची ही पहिली वेळ असून अशा प्रकरणांना हाताळण्यासाठी पोलिसांना मानक कार्यप्रणालीचे पालन करायचे आहे असेही अधिकाऱ्याने सांगितले.

सर्व माहिती संबंधित शहरांना पाठवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. आतापर्यंत सात एफआयआर दाखल झाले असून अजून होणे बाकी आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहे. फक्त मुंबईत 500 प्रकरणे आहेत. दिल्ली, गुजरात आणि केरळमध्ये ही आकडेवारी मिळण्याआधीच कारवाई करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.