ढाका: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज करोना विषाणूमुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 72,750 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यापूर्वी सरकारने 5 हजार कोटी टकाचे पॅकेज देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी जाहीर केले आहे. निर्यातीसंदर्भातील उद्योगांमध्ये आता अतिरिक्त, 67,500 कोटी रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात आले आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला उद्देशून टिव्हीवरून केलेल्या भाषणात रविवारी या पॅकेजची घोषणा केली. नवीन पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला अपेक्षित विकास दर साध्य करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या पॅकेजमध्ये वाढलेले सार्वजनिक खर्च, उद्योगासाठी प्रोत्साहन पॅकेज, सोशल सेफ्टीची व्याप्ती वाढवणे आणि अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा वाढविणे यासह चार कार्यक्रमांचा समावेश आहे.