इस्लामाबाद: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी पाकिस्तानने आज शिथील केली. पाकिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकेच्या 294 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या अमेरिकेच्या विमानाला उतरण्यासाठी ही बंदी शिथील करण्यात आली. 21 मार्च रोजी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाकिस्तानने सर्व परदेशी उड्डाणे दोन आठवड्यांसाठी स्थगित केली होती. करोनामुळे देशातील 2,708 लोकांना संसर्ग झाला आहे.
अमेरिकन नागरिकांना परत आणण्यासाठी हे खास विमान प्रथम कराची विमानतळावर आणि नंतर काल इस्लामाबाद येथे उतरले, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. या विमानात कराचीहून 119 अमेरिकन नागरिक आणि इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नऊ मुत्सद्दी लोकांसह 155 अमेरिकन नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात आले.