बीजिंग – चीनच्या ईशान्य भागातील एका रेस्टॉरंटला लागलेल्या ( Restaurant fire kills 17 people in northeastern China ) आगीत 17 जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी ही दुर्घटना घडल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. चांगचून शहरात साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
आगीचे वृत्त समजल्यानंतर युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले असून जखमींना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चीनकडे अशा आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात.
अवैध बांधकामे आणि दाट वस्तीच्या भागात या घटना घडत असून तेथे मदतकार्य पोहोचणेही जिकिरीचे होते असे सांगण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीलाही चांगशा शहरात आग लागण्याची मोठी घटना घडली होती. गेल्या जुलैमध्ये लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला होता.