Pro Kabaddi League : भारतात क्रिकेटप्रमाणेच कबड्डी खेळालाही चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. कबड्डीच्या प्रत्येक हंगामात चाहत्यांना वेगवेगळ्या स्टार खेळाडूंचा खेळ पाहायला मिळतो. असाच कबड्डीचा रोमांच आता पुन्हा एकदा सुरु होणार आहे. कबड्डी खेळातील सरावात मोठी प्रो कबड्डी लीग लवकरच सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या ९ व्या हंगामाला ७ ऑक्टोबर पासून सुरुवात होईल. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशांचे खेळाडू सहभागी होतात.
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक आयोजकांकडून प्रसिधद करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सामने कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले त्याबाबत देखील सर्व माहिती देण्यात आली आहे. बंगलोर येथील श्री कांतीर्व इनडोअर स्टेडियम आणि पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल याठिकाणी स्पर्धेच्या सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रो कबड्डी लीग ( Pro Kabaddi League ) स्पर्धेच्या ९ व्य हंगामात एकूण १२ संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बंगाल वॉरियर्स, बेंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पँथर्स, पटना पायरेट्स, पुणेरी पलटन, तमिळ थलायवास, तेलुगू टायटन्स, यू मुंबा आणि यूपी योद्धा या संघानी सहभाग घेतलेला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सगळ्याच संघांनी आपापली संपूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ यंदाच्या हंगामात विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. ( Pro Kabaddi League 2022 9 season timetable and teams name update )
७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचा ( Pro Kabaddi League ) पहिला सामना दबंग दिल्ली आणि यु मुंबा यांच्यात खेळाला जाणार आहे. या सामान्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टार वर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहायचे असतील तर त्यासाठी अगोदर ऑनलाईन तिकीट बुक करावे लागणार आहे. स्पर्धेतील दररोजचा पहिला सामना हा रात्री ७:३० पासून सुरु होणार आहे.
प्रो कबड्डी लीगच्या ( Pro Kabaddi League ) ८ व्या हंगामाच विजेतेपद दबंग दिल्लीने पटकावलं होतं. त्यांनी मागील हंगामाच्या फायनल सामन्यात पटना पायरेट्स संघाला हरवले होते. यंदाच्या हंगामात स्पर्धेला पूर्ण संख्येने प्रेक्षक देखील हजार असणार आहेत. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना आणखी उत्साहाने खेळात येणार आहे.