सातारा, (प्रतिनिधी) – बर्याच वर्षांनंतर सातारकरांचे मनोरंजन करायला येथील कोटेश्वर मैदानावर आलेल्या बिंगो सर्कसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 108 कलाकारांचा सहभाग असलेली ही सर्कस आबालवृद्धांना मंत्रमुग्ध करणारी आहे. ही सर्कस पाहून आनंद द्विगुणीत करा, असे आवाहन बिंगो सर्कसचे मालक सुनील चौहान यांनी केले आहे.
कलाकारांच्या विविध कसरती, विदूषक, जादूचे प्रयोग ही या सर्कशीतील आकर्षणे आहेत. देशात पाच पिढ्यांचा इतिहास असलेली सुप्रसिद्ध बिंगो सर्कस सातार्यात दर काही वर्षांनी येते. अनेक धाडसी खेळ व नव्या काळातील सांहसी खेळ यामुळे ही सर्कस अजूनही लोकप्रिय आहे. माजी नगरसेवक विजय तारू यांच्या प्रयत्नांमुळे या सर्कसचे सातारा शहरात पाच वर्षांनी आगमन झाले आहे.
त्यामुळे या सर्कसबद्दल उत्सुकता आहे. बाळगोपाळांना लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असून, त्यांचे निखळ मनोरंजनास करण्याठी सर्कशीतील कलाकार अथक परिश्रमाने तयारी करत असल्याचे व्यवस्थापक माणिक खांडेकर यांनी सांगितले. बिंगो सर्कस पुढील एक महिना सातार्यात राहणार असून, या सर्कसचा आनंद सातारकरांनी घ्यावा, असे आवाहन सुनील चौहान यांनी केले आहे.