सातारा, (प्रतिनिधी) – दिव्यागांच्या विविध मागण्यांसाठी स्वत: दिव्यांग असलेल्या अजय पवार यांनी दरे, ता. महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने, पवार यांनी उपोषण सुरू केले आहे.
सातारा जिल्ह्यातील दिव्यांगांचा अनुशेष भरावा, दिव्यांग, निराधार, विधवांची पेन्शन पाच हजार रुपये करावी, प्रत्येक जिल्ह्यात दरमहा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांबरोबर दरबार घ्यावा, सातारा जिल्ह्यात दिव्यांग भवनासाठी जागा व निधी द्यावा, शासन निर्णयानुसार व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फूट जागा देण्याचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावेत, बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेणारे प्राथमिक शिक्षक गणेश दुबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशा मागण्या आहेत.
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांच्यावर कारवाई कधी होणार? आमची संस्था सहा वर्षे काम करत असताना, 150 फुटांवर दुसर्या संस्थेस जागा कशी देण्यात आली? मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यावर कधी कारवाई होणार, असे प्रश्न अजय पवार यांनी उपस्थित केले आहेत.