नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी खेळाडूंकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. त्यात आता विनेश फोगाट यांची बहिण बबिता फोगाट यांनी या आंदोलनाबाबत ट्वीट केल आहे. त्याच ट्वीटला विनेश फोगाट यांनी उत्तर देत बबिता फोगाट यांना कळकळीची विनंती केली आहे.
बबिता फोगाट भाजपाच्या तिकिटावरून हरियाणा विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. बबिता फोगाट यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केले होते. ते ट्विट काँग्रेसवर टीका करणारे होते. बबिता फोगाट यांचं ट्वीट आल्यानंतर त्यावर अनेकांनी विरोधात रीट्वीट केले आहेत. तर, विनेश फोगाट यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “जर पीडित महिला कुस्तीपटूंच्या हक्कासाठी उभे राहता येत नसेल तर बबिता तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या आंदोलनाला कमजोर करू नका”, असं ट्वीट विनेश फोगाट यांनी केलं आहे.
अगर पीड़ित महिला पहलवालों के हक़ में नहीं खड़ी हो सकती तो बबीता बहन आपसे हाथ जोड़कर विनती है कि हमारे आंदोलन को कमज़ोर तो मत करो
सालों लगे हैं महिला पहलवानों को अपने उत्पीड़क के ख़िलाफ़ आवाज़ उठाने में
आप भी महिला हैं और हमारा दर्द समझने की कोशिश करो । 🙏🙏 https://t.co/cfk9W1yTvj
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 29, 2023
त्या पुढे म्हणाल्या की, “महिला कुस्तीपट्टूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला वर्षे लागली आहेत. तुम्हीही महिला आहात आणि आमचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा.”
बबिता फोगट यांनी “महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी प्रियंका वड्रा त्यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यासोबत जंतरमंतरवर पोहोचले आहेत. पंरतु, या व्यक्तीने स्वतः महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे, तसंच त्यांनी दलित महिलांविरोधातही वक्तव्य केलं होतं,” असे ट्वीट केले होते.