बारामती (प्रतिनिधी) : म्हाडा कॉलनीतील कोरोना संक्रमित रुग्णाच्या मुलाचे व नातवाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांनी सांगितले आहे. बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
शहरातील म्हाडा कॉलनीतील एका औषध दुकानात कार्यरत कर्मचा-याच्या 77 वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते . या रुग्णाच्या संपर्कातील सोळा जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. सुरुवातीला 14 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यानंतर आज रुग्णाच्या मुलाचा व नातवाचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे.
बारामती शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सात इतकी झाल्यानंतर एका 77 वर्षीय रुग्णाचा यामध्ये मृत्यू झाला तर शहरातील पहिला ठरलेला रुग्ण रिक्षाचालक मात्र कोरोना मुक्त झाला आहे इतर पाच जणांची प्रकृतीत सुधारणा होत आहे.