बारामती, (प्रतिनिधी) – बारामती येथील ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूलला राष्ट्रीय नामांकित असोसिएशन ऑफ ब्युटी थेरेपी अँड कॉस्मेटोलॉजी (एबीटीसी) मुंबई या संस्थेचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती बारामतीच्या प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ मेकअप आर्टिस्ट पूजा देशमुख यांनी दिली.
एबीटीसी संकुल अॅण्ड एज्युकेशन मुंबईच्या प्रमूख नम्रता गौड यांनी तपासणी अधिकारी म्हणून भेट दिली. एबीटीसी ही ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील नामांकित संस्था आहे.या संस्थेतर्फे ऑरेंज स्किल फाउंडेशन संचलित ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूलला आजीवन सदस्यत्व देण्यात आले आहे.
सौंदर्य क्षेत्रातील नामांकित संस्था असलेल्या या संस्थेमार्फत एबीटीसी ब्युटी थेरेपिस्ट आणि एबीटीसी मेकअप आर्टिस्ट अशा दोन प्रशिक्षण कोर्सला मान्यता मिळाल्याची माहिती ऑरेंज स्किल फाउंडेशनच्या संस्थापिका सचिव पूजा देशमुख यांनी दिली.
एबीटीसी ही भारत देशातील सौंदर्य प्रसाधन क्षेत्रामध्ये काम करणारी एक मोठी संस्था असून बारामती सारख्या ठिकाणी सौंदर्यक्षेत्रात काम करणार्या युवती, महिला भगिनींसाठी या कोर्सेसच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. बारामती व पंचक्रोशीतील हे प्रथम एकमेव मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र आहे.
एबीटीसी मुंबई मान्यताप्राप्त ऑरेंज ब्युटी अँड मेकअप आर्टिस्ट स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर देशभरातील नामांकित ब्रँडच्या व सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील कंपनीसोबत काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. प्रशिक्षणामध्ये ब्युटी अँड मेकअप क्षेत्रातील अगदी छोट्या मोठ्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बारामती व पंचक्रोशीतील महिलांसाठी ही मोठी आनंदाची बाब असून सौंदर्य हा स्त्रीचा दागिना असून ते जपण्यासाठी ्व खुलविण्यासाठी ज्ञानाची गरज आहे व तेच ज्ञान आत्मसात करण्यासाठी बारामती येथील ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूलने् या क्षेत्रात काम करण्यासाठी मोठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अभ्यासक्रमाला महिला, युवती, गृहिणींनी प्रवेश घेऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन पूजा देशमुख यांनी केले आहे.