तुकाराम मुंढे यांची बदली

मुंबई: दबंग अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम करत होते. मुंढे हे आपल्या कामामुळे कायम चर्चेत असतात त्यामुळे भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यामुळे मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे बोललं जात आहे. यापूर्वी तुकाराम मुंढे आणि भाजप सत्तेत असताना नाशिकमध्ये संघर्ष झाला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.