#RanjiTrophy : महाराष्ट्राचे आसामसमोर २९७ धावांचे आव्हान

गुवाहटी : महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत दुसरा डाव ९ बाद ३६५ धावसंख्येवर घोषित करून आसामसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रत्युत्तरात आसामने तिस-या दिवसअखेर बिनबाद १२ धावा केल्या आहेत. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असून आसामला विजयासाठी आणखी २८५ धावांची आवश्यकता आहे.

महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद १७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आसामने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावांपर्यत मजल मारत ६९ धावांची आघाडी घेतली होती.

यानंतर महाराष्ट्राने जय पांडेच्या १३० धावांच्या जोरावर दुसरा डाव ९ बाद ३६५ वर घोषित करत आसामसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवलं.

प्रत्युत्तरात तिस-या दिवसअखेर आसामने ६ षटकांत बिनबाद १२ धावा केल्या होत्या. आसामला अजूनही २८५ धावांची तर महाराष्ट्राला १० विकेटची गरज आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा राहुल हजारिका १ आणि शुभम मंडल ७ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : सर्वबाद १७५(अंकित बावणे ७५, सत्यजित बच्छाव ४०,अरूप दास ४-६६,रणजित माली ४-५५) आणि दुसरा डाव : महाराष्ट्र : ९ बाद ३६५ वर घोषित : ( जय पांडे १३०, व्ही मोरे ५७, एस बच्छाव ५१, रणजीत माली ५-१२३, अरूप दास २-६९, मुख्तार हुसेन २-९४) विरूध्द आसाम : पहिला डाव : ७८.१ षटकांत सर्वबाद २४४( रूषव दास ९४, शुभम मंडल ३२, रियान पराग २३, सत्यजित बच्छाव ४-४४, मुकेश चौधरी ३-८२, आशय पालकर २-५५) आणि आसाम : दुसरा डाव : ६ षटकांत बिनबाद १२ (राहुल हजारिका १ आणि शुभम मंडल खेळत आहे ७ ).

Leave A Reply

Your email address will not be published.