बॉलीवूडमधील मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेच्या बर्थ डे निमित्त कलाकारांसह चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रेणुकाने काल म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी अनेकांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये एक खास शुभेच्छा आहे. ती म्हणजे रेणुकाचा पती अर्थात अभिनेता आशुतोष राणा याची.
आशुतोषने त्याच्या आयुष्यात रेणुकाचे काय महत्त्व आहे, यासंदर्भात एक मार्मिक अशी पोस्ट लिहिली आहे. तसेच आपल्या सहजीवनीसाठी त्याने एक कविताही पोस्ट केली आहे. ही पोस्ट खूपच रोमॅंटिक आहे. ही पोस्ट शेअर करताना आशुतोष राणाने रेणुकाचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर या दोन्ही कलाकारांचे चाहते आणि त्यांचा मित्रपरिवार खूप कमेंट्स करत आहेत.
दरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षितनेदेखील रेणुका शहाणेंसाठी एक थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दोघीजणी “लो चली मैं’ या चाहत्यांच्या आवडीच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये माधुरीने असे म्हटले आहे की, “आपल्या आयुष्यभरासाठी पुरणाऱ्या खूप आठवणी आहेत. हम आपके है कौनपासून बकेट लिस्टपर्यंत. तुझ्याबरोबर वेळ घालवणे हा आनंददायी अनुभव होता. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि हे वर्ष सुखाचे जावो’.