मेट्रोबाधितांचे पुनर्वसन तातडीने व्हावे : विभागीय आयुक्‍त

पुणे – मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी महामेट्रो आणि “पीएमआरडीए’ मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचे काम लवकर सुरू करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

मेट्रो बाधित झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, “महा मेट्रो मार्ग-1 आणि 2 तसेच “पीएमआरडीए’ मेट्रो मार्ग-3 मध्ये बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे एकत्रित पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्‍यक आहे. या विषयी बाधितांच्या प्रतिनिधींसोबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी, असेही डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत सांगितले.

महामेट्रो, पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पुर्नवसनाबाबतची कार्यवाही समन्वय ठेवून पूर्ण करावी, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले. मेट्रो मार्गातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाबाबत तसेच पुनर्वसन करता येणाऱ्या जागांबाबत जिल्हाधिकारी राम यांनी माहिती दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)