अभिनेता आर माधवनचा अभिनय आणि लुक्समुळे हिंदी तसेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत मोठा चाहता वर्ग आहे. तरुणींमध्येही माधवनची क्रेझ आहे. नुकतेच एका १८ वर्षीय तरुणीने आर माधवनला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे.
आर माधवन सध्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ चित्रपटात व्यस्त असून यातील नवाकोरा लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केला. माधवनच्या या फोटोवर एका १८ वर्षीय तरुणीने चक्क त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने लिहले कि, मी १८ वर्षाची असून मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, यात काही चुकीचे आहे का? तिच्या या प्रश्नावर माधवनने अत्यंत शांतपणे उत्तर दिले. देव तुझे भले करो. तू माझ्यापेक्षा अधिक चांगल्या व्यक्तीला शोधू शकतेस, असे उत्तर माधवनने दिले आहे. माधवनचा हा लूक चाहत्यांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनाही चांगलाच भावाला आहे. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने लिहले कि, तू फेअर अँड हॅण्डसम वापरत आहेस का?
दरम्यान, ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सिनेमाच्या निमित्ताने आर. माधवन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात माधवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या यशोगाथेवर आधारलेला आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सिनेमा तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.