अभिनेता राहुल बोसचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

मुंबई : अभिनेता राहुल बोसचा एक व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण यात त्याने मोठ्या हॉटेलमधील वस्तुंवर मनमानी किंमतींचे टॅग कशा पद्धतीने लावण्यात येतात याविषयी त्याने माहिती दिली आहे. यासाठी त्याने स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. राहुल बोस एका 5 स्टार हॉटेलात मुक्कामाला आहे. या हॉटेलात केवळ दोन केळी खाणे राहुलला चांगलेच महागात पडले.

राहुलने हॉटेलमध्ये वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याने स्वत:साठी दोन केळी ऑर्डर केली. वेटर लगेच दोन केळी घेऊन आला. पण या दोन केळींचे बिल पाहून राहुलचे डोळे पांढरे झाले. होय, राहुलने केवळ दोन केळी खाल्ली. या दोन केळींसाठी त्याला 442 रूपये मोजावे लागलेत. राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास बसण्यासाठी तुम्हाला हे पाहावे लागेल. फळे तुमच्या आयुष्यासाठी हानीकारक नाहीत, असे कोण म्हणेल? या हॉटेलला विचारा…, असे तो या व्हिडीओत म्हणतोय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)