मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केल्याची बातमी सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. 34 वर्षीय सुशांत ने रविवारी वांद्रे येथील आपल्या निवास्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरा बसला होता.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूड कलाकार शाहरुख खान, सलमान, अक्षय कुमार, सारा अली खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांच्यासह अन्य दिग्गज मंडळींनी सुशांतच्या आत्महत्येबाबत आपले दु:ख व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सुशांतच्या निधनाबाबत आता WWE स्टार जॉन सीना याने ‘सुशांत’चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपले दु:ख जाहीर केले आहे. यापूर्वी सुद्धा जॉन सीना याने अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्या निधनाच्या वेळी आपल्या इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली होती