सर्वच वाहनांना 1 ऑगस्टपासून “रिफ्लेक्‍टर’ बंधनकारक

पुणे – केंद्रीय मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार “एआयएस’ आणि “एआयएस’ मानकांची पूर्तता करणारे मान्यताप्राप्त “रिफ्लेक्‍टर्स’ आणि “रिफ्लेक्‍टिव्ह टेप्स’ आणि मागील बाजूस “रियर मार्किंग प्लेट किंवा टेप’ अवजड आणि प्रवासी लावणे बंधनकारक निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी दि.1 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या मुदतवाढीनंतर निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

“रिफ्लेक्‍टर्स’, “रिफ्लेक्‍टिव्ह टेप्स’ची पाहणी केल्यानंतरच संबंधित वाहनांना नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्याचे सांगण्यात आले असून राज्याचे अतिरीक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी दि.1 जून रोजी याबाबतचे परिपत्रक काढून दि.1 जुलैपासून त्याची अंमलबजाणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याने वाहनचालकांना अडचणी येत होत्या. पासिंगसाठी आलेले वाहतूकदार कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत. यासह या निर्णयाला वाहतूक संघटनांकडून विरोध करण्यात येत होता. परिणामी, निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

अखेर महिन्यानंतर आता 1 ऑगस्टपासून याची अंमलबजाणी करण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांना या बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. दरम्यान, रिफ्लेक्‍टर्स लावण्यासाठी काही डिलर्सकडून तयारी करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणी येणार नसल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)