कास तलावाच्या पाणीपातळीत घट

सातारा – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. सद्य स्थितीत तलावात 13.3 इंच फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे.

कास तलावाचा पहिला व्हॉल्व्ह एक महिन्यापूर्वी पूर्ण उघडा पडला असून दुसऱ्या व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा सुरू आहे. तलावाची पाणीपातणी नऊ फुटांवर आल्यानंतर दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडतो. गतवर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस साडेसोळा फूट पाणीसाठा होता. तलावाची पाणीपातळी दररोज एक ते सव्वा इंचाने कमी होत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत तलावात दीड फूट कमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून राहावा, यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्‍यक आहे. एकूण तीन व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्याचा पाणीसाठा पाहता एप्रिलपर्यंत दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.