-->

तहसील कार्यालयातील रेकॉर्डकीपर “एसीबी’च्या जाळ्यात

तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना कराडमध्ये पकडले

कराड – फेरफार उताऱ्याची नक्कल देण्यासाठी 800 रुपये लाचेची मागणी करून 300 रुपये लाच स्वीकारताना कराड तहसील कार्यालयातील रेकॉर्डकीपर महेश्वर नारायण बडेकर (रा. शिवशक्ती निवास, शास्त्रीनगर, मलकापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदाराला त्याच्या मिळकतीचा फेरफार उतारा हवा होता. त्यासाठी अभिलेख कक्षपाल महेश्वर बडेकरने तक्रारदाराकडे 800 रुपये लाच मागितली होती. बडेकरने तक्रारदाराकडून सोमवारी (दि. 22) 500 रुपये स्वीकारले होते.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. यावेळी उरलेली रक्कम पकडताना पोलिसांनी बडेकरला पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संभाजी काटकर, नीलेश येवले, पोलीस नाईक विनोद राजे यांनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.