दक्षिण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आपल्या आगामी “आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील अजय देवगणचा पहिला लुक आज प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये अजय देवगण दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीत आता एसएस राजामौली यांनी “आरआरआर’चे हक्क नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स पेन स्टुडिओला विकल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रॉडक्शन हाऊसद्वारेच प्रदर्शित केली जाईल. जयंतीलाल गडा यांनी 1900च्या दशकावर आधारित या चित्रपटाचे सर्व भाषांमधील इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सॅटेलाईट अधिकार खरेदी केले आहेत. एस.एस. राजामौली आणि जयंतीलाल गाडा यांच्यात नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्ससाठी विशेष करार झाला आहे. बॉलीवूड स्टुडिओने हिंदी डब सॅटेलाईट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक हक्क यासह सुमारे 200 ते 210 कोटी रुपयांच्या करारास अंतिम मान्यता दिली आहे.
View this post on Instagram
व्यापारिक स्त्रोतानुसार जयंतीलाल गडा यांनी हिंदी आवृत्तीच्या सॅटेलाईट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक हक्कांमध्ये 50% भागीदारी घेतली आहे. या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती. परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा “आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे.