बॉलिवूडमधील खिलाडी अर्थात अक्षय कुमार लवकरच आगामी “राम सेतू’ चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले. तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र याच चित्रपटातील एका फोटोमुळे अक्षयला अभिनेत्री नुसरत भरुचाची माफी मागावी लागली आहे.
View this post on Instagram
राम सेतू या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा देखील झळकणार आहे. तिने नुकतेच चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती जेवणाच्या डब्यांसोबत उभी राहिलेली दिसत आहे. तिच्या या फोटोवर अक्षय कुमारने गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. अन् अशा प्रकारे नुसरत लंच बॉक्सच्या सेटवर येते.
View this post on Instagram
माफ करा “राम सेतू’च्या सेटवर येते. अशी कॉमेंट त्याने केली. लंच बॉक्स हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयची ही कॉमेंट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “राम सेतू’ या चित्रपटात अक्षय एका इतिहास तज्ज्ञाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक शर्माने स्विकारली आहे. या चित्रपटात अक्षयसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.