साहित्य : एक मोठा नारळ, चार पेढे, दोन बर्फीच्या वड्या, दूध अर्धी वाटी, बदाम किंवा काजूचे तुकडे, बेदाणे, साखर दीड वाटी.
कृती :
नारळ खोवून घ्यावा. पेढे व बर्फी हाताने कुस्करून मोकळी करावी नंतर खोवलेला नारळ, पेढे, बर्फी, दूध असे सर्व एकत्र शिजवावे. वरीलप्रमाणेच गोळा आटवावा व वड्या पाडाव्यात. टीपः यात पेढे, बर्फी घातल्याने वेगळे काही घालण्याचे गरज नाही. चव छान येते. तसेच बर्फीऐवजी नुसते पेढे घातले तरी चालते. ( Recipe Coconut Mango Barfi )