श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील यात्रा रद्द

मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी बुधवार दि. 10 ते 12 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्त दर्शनासाठी येण्याची शक्‍यता आहे. यामुळे गर्दी होऊन करोनाचा प्रसार वाढू शकतो. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात कोणत्याही व्यक्तीला येथील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्य मनाई करणारा आदेश लागू केला आहे.

भाविकांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येऊ नये. तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने यात्रा नियोजन करण्यात येऊ नये. यात्रा कमिटीच्या वतीने ऑनलाइन दर्शन प्रणालीचा वापर करुन भाविक भक्तांना मोबाईल ऍपद्‌वारे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात यावा. पाच आणि पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.