साहित्य ः
(1)दोन वाट्या काबुली चणे (2)चार-पाच पाकळ्या लसूण (3)अर्धा इंच आले (4)एक कांदा (5)दोन टोमॅटो (6)एक इंच दालचिनी (7)दोन वेलची (8)एक चमचा छोले मसाला (9)अर्धा चमचा मीठ (10)अर्धा चमचा आमचूर (11)दोन बटाटे (12)पाव चमचा खाण्याचा सोडा (13)कोथिंबीर (14)चार चमचे तेल
कृती ः
काबुली चणे रात्रभर सोड्याच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उकडून घ्यावेत. बटाटेही उकडून घ्यावेत. उकडताना छोल्यावर दालचिनीचा तुकडा, हवेली घालावी.तेलावर कांदा परतून टोमॅटो घालावा. दोन्ही एकजीव झाल्यावर आले-लसूण पेस्ट, मीठ, मसाला, तिखट, काबुली चणे त्यात घालावेत. एक टेबलस्पून उकडलेले काबुली चणे मिक्सरमधून काढून घालावेत. यामुळे ते वाटण घातले की रस दाट होतो. मंद विस्तवावर खूप शिजवावेत. चांगले शिजल्यावर आमचूर घालून पानावर वाढावेत.
तीन चार जणांना पुरतात.