जिनेव्हा – करोनाच्या नव्या व्हायरसबद्दल सगळीकडे चिंतेचे आणि भितीचे वातावरण असताना आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओने दिलासा देण्याचे काम केले आहे. कालपासून ग्रेट ब्रिटनच्या प्रवासावर जगातील जवळ जवळ बहुतेक देशांनी बंदी लावली आहे.
ब्रिटनहून प्रवासाला आतापर्यंत चाळीस देशांनी बंदी लावली आहे. यात युरोपातील संघ एक कॉमन पॉलिसी बनवण्यावर विचार करीत आहे.
डेन्मार्कमध्ये देखील एका नव्या करोना व्हायरसचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात स्वीडनने डेन्मार्कहून प्रवास करण्यास बंदी लावली आहे.
व्हायरसचा एक नवा विषाणू जास्त वेगाने संक्रमण फैलावणारा आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. तो कंट्रोल होण्यासारखा असा दिलासा देणारी बातमी आहे.
डब्ल्यूएचओचे इमरजन्सी चीफ माईक रायन यांनी म्हटलं आहे की, करोनाच्या साथीत असा नवा स्ट्रेन मिळणे, ही एक सामान्य बाब आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. पण या आधी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी या नव्या व्हायरससाठी अनकंट्रोल हा शब्द वापरला होता.
काही देश दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या लोकांवरही बंदी लावत आहेत. कारण तेथे देखील करोना व्हायरस आणखी एक प्रकार मिळाला आहे, जो ब्रिटनच्या व्हायरसपेक्षा वेगळा आहे.