मुंबई – महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले की, युतीसाठी मी ही लोकसभेची जागा सोडण्यास आणि राजीनामा देण्यास तयार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 2024 मध्ये केंद्रात पुन्हा सेना-भाजपचे सरकार (एनडीएचा भाग म्हणून) स्थापन व्हावे अशी आमची इच्छा आहे.
डोंबिवलीतील काही नेते भाजप – शिवसेना युतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी त्यांनी युतीसाठी अडथळे निर्माण केले आहेत, तथापि मला कोणत्याही पदाची इच्छा नाही.
भाजप-सेनेचे वरिष्ठ नेतृत्व जो उमेदवार ठरवेल त्याला मी पाठिंबा देईन, असे ते म्हणाले. शिंदे 2014 पासून मुंबईजवळील कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.