मोडवे येथील 7 व 18 वर्षांचा दोन मुली बाधित…
बारामती (प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील मोढवे येथे भांडुप येथून आजोळी आलेल्या दोन मुली करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. बारामती शहरनंतर पुन्हा एकदा तालुक्यात देखील करोनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील करोनाची संख्या 25 वर पोहोचली आहे.
मुंबई (भांडुप) येथून या मुली मोढवे येथे रविवारी (दि. 14) आजोळी आल्या आहेत. शुक्रवारी (दि. 19) या मुलींची आई करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आजोळी आलेल्या दोन्ही मुलींची तपासणी केली असता त्या करोना संक्रमीत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर रुई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोडवे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था राखण्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.