मुंबई : IPL 2022 मध्ये 60 वा सामना आज खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात बंगळुरू संघाने कोणताही बदल केलेला नाही. पंजाब किंग्जने मोठा बदल करत संदीप शर्माच्या जागी हरप्रीत ब्रारला संघात समाविष्ट केले आहे.
🚨 Toss Update 🚨@RCBTweets have elected to bowl against @PunjabKingsIPL.
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1 #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/xyx7pc62X3
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग-11
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग-11 : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
पंजाब किंग्ज प्लेइंग-11 : जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टन, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार
दरम्यान, पंजाबने 11 सामन्यात 5 विजय मिळवले आहे. 10 गुणांसह ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. अशा स्थितीत प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी पंजाबला आजच्या सामन्यासह उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. साखळी सामन्यांमध्ये आता आणखी 10 सामने खेळायचे बाकी आहेत. मात्र यादरम्यान केवळ गुजरातच्या संघानेच प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता तीन जागांसाठी सात संघांमध्ये लढत होणार आहे. या दृष्टीने पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील हा सामनाही दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.