दुबई – अबु धाबीचे अध्यक्ष आणि सत्ताधीश शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान यांचे आज निधन झाले. अध्यक्षीय व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. शेख खलिफा यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून यूएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून काम केले.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल अध्यक्षीय व्यवहार मंत्रालयाने 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. याकाळात देशभरातील झेंडे अर्ध्यावर फडकवले जातील आणि मंत्रालये, विभाग, फेडरल आणि स्थानिक संस्था आजपासून सुरू होणारे काम स्थगित करतील, असेही अध्यक्षाय व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
1948 मध्ये जन्मलेले खलिफा 2004 मध्ये सर्वात श्रीमंत अमीरात अबू धाबीमध्ये सत्तेवर आले आणि राज्याचे प्रमुख बनले. अबू धाबीचे शासक म्हणून त्यांचे सावत्र बंधू युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नाहयान हे त्यांच्यानंतर येण्याची अपेक्षा आहे. मोहम्मद बिन झायेद हे अमेरिकेचा मित्र देश असलेल्या युएईचे वास्तविक शासक आहेत, विशेषत: 2014 मध्ये खलिफांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर ते क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसले होते.