WPL Live Cricket Score, RCB vs MI, Women’s Premier League 2024 : कर्णधार हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सने आरसीबीचा सात गडी राखून पराभव केला आहे. अमेलिया करच्या झंझावाती खेळीच्या बळावर मुंबईने मानधनाच्या संघाचा 29 चेंडू राखून पराभव केला.
या मोसमात मुंबईचा आरसीबीविरुद्धचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी गेल्या मोसमात मुंबईने आरसीबीला दोनदा पराभूत केले होते. त्याचवेळी आरसीबीचा या मोसमातील हा दुसरा पराभव आहे.
Amelia Kerr top-scored with the bat in Mumbai Indians’ clinical chase & she receives the Player of the Match award 🏆
Scorecard 💻📱https://t.co/VqyJ4Y545d#TATAWPL | #RCBvMI pic.twitter.com/3iprYGAUTT
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 2, 2024
132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका भाटियाच्या रूपाने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. 15 चेंडूत 31 धावा करून ती बाद झाली. तिने आपल्या खेळीत 4 चौकार अन् 2 षटकार लगावले. त्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणारी हेली मॅथ्यूज 26 धावा करून बाद झाली. यादरम्यान तिच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकार आला. नॅट सिव्हर ब्रंट ही25 चेंडूत चार चौकारासह 27 धावांची खेळी करून बाद झाली. अमेलिया कर हीने 24 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तिने आपल्या खेळीत 7 चौकार लगावले. तर पूजा वस्त्रकार हि 8 धावांवर नाबाद राहिली.
WPL 2024 ( #RCBvMI Match 9 ) :आरसीबीचे मुंबई इंडियन्ससमोर 132 धावांचे लक्ष्य…
तत्पूर्वी, महिला प्रीमियर लीगच्या नवव्या सामन्यात स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबईविरूध्द प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या.
यादरम्यान ॲलिस पेरी आणि जॉर्जिया वेअरहॅम यांच्यात 52 धावांची भागीदारी झाली. मुंबईविरुद्ध आरसीबीची सुरुवात खास नव्हती. सलामीला फलंदाजीला आलेली कर्णधार स्मृती मानधना नऊ धावा करून बाद झाली. संघाला दुसरा धक्का तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सबिनेनी मेघनाच्या रूपाने बसला आणि तिला 11 धावा करता आल्या. तिसरा धक्का सोफी डिव्हाईनच्या रूपाने बसला, तिला 10 चेंडूत 9 धावा करता आल्या.
या सामन्यात ऋचा घोषने सात धावा, सोफी मोलिनेक्सने 12 धावा आणि जॉर्जिया वेरेहमने 27 धावा केल्या. एलिस पेरी 38 चेंडूत 44 आणि श्रेयंका पाटील पाच चेंडूत 7 धावा करून नाबाद राहिली. मुंबईकडून गोलंदाजीत नाटे सिव्हर ब्रंट आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इसी वोंग आणि सायका इशाक यांना प्रत्येकी एक यश मिळाले.