WPL Live Cricket Score, RCB vs MI, Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा नववा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. महिला प्रीमियर लीगच्या नवव्या सामन्यात स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या असून मुंबई इंडियन्ससमोर 132 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
Innings Break!
A disciplined bowling performance from Mumbai Indians keeps #RCB to 131/6 👏👏
Can @RCBTweets defend this total?
Scorecard 💻📱https://t.co/VqyJ4Y545d#TATAWPL | #RCBvMI pic.twitter.com/Vk3PpUojGv
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 2, 2024
यादरम्यान ॲलिस पेरी आणि जॉर्जिया वेअरहॅम यांच्यात 52 धावांची भागीदारी झाली. मुंबईविरुद्ध आरसीबीची सुरुवात खास नव्हती. सलामीला फलंदाजीला आलेली कर्णधार स्मृती मानधना नऊ धावा करून बाद झाली. संघाला दुसरा धक्का तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सबिनेनी मेघनाच्या रूपाने बसला आणि तिला 11 धावा करता आल्या. तिसरा धक्का सोफी डिव्हाईनच्या रूपाने बसला, तिला 10 चेंडूत 9 धावा करता आल्या.
WPL 2024 ( #UPWvGG Match 8 ) : हॅरिसच्या झंझावाती खेळीच्या जोरावर यूपीचा सलग दुसरा विजय…
या सामन्यात ऋचा घोषने सात धावा, सोफी मोलिनेक्सने 12 धावा आणि जॉर्जिया वेरेहमने 27 धावा केल्या. एलिस पेरी 38 चेंडूत 44 आणि श्रेयंका पाटील पाच चेंडूत 7 धावा करून नाबाद राहिली. मुंबईकडून गोलंदाजीत नाटे सिव्हर ब्रंट आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इसी वोंग आणि सायका इशाक यांना प्रत्येकी एक यश मिळाले.