नवी दिल्ली – न्यूझीलंडचा युवा यष्टीरक्षक फलंदाज फिन एॅलेन याची आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आपल्या संघात निवड केली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आपली निवड केल्याने फिन एॅलेनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना फिन एॅलेन म्हणाला आयपीएल खेळण्यासाठी माझी निवड होणे म्हणजे माझे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे आणि त्याला ही चांगली संधी मिळाली.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने निवड केल्यानंतर एका मुलाखतीमध्ये फिन एॅलेनने सांगितले की, आरसीबी के डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशंस माइक हेसन सोबत त्याचे काय बोलणे झाले. त्याने सांगितले, “माइक हेसनने मला विचारले की मी आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक आहे का? यावर मी म्हणालो की, ही विचारण्याची गोष्ट नाही. हे मला एक माझे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मला ही संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. माझा अजून ही विश्वास बसत नाही. मला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी थोडा वेळ लागेल.”
जोश फिलिपच्या जागी फिन एॅलेनला आरसीबीने साईन केले
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने जोश फिलिपच्या जागी फिन एॅलेन ला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. कारण जोश फिलिप हा यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध असणार नाही. मागील हंगामात जोश फिलिपने आरसीबी संघासाठी पाच सामन्यात प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्याने 78 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दुसरीकडे फिन एॅलेनला आयपीएल खेळण्याचा अनुभव नाही. त्याने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत.
परंतु फिन एॅलेनने न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश स्पर्धेत दमदार प्रदर्शन केले आहे. या कारणामुळे आरसीबीने त्याला खेळण्याची संधी दिली आहे. त्याने 11 सामन्यात 56.89 च्या सरासरीने आणि 193.94 च्या स्ट्राईक रेटने 512 धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्याने 6 अर्धशतकं सुद्धा लगावली आहेत. न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणारा तो फलंदाज होता.