मुंबई – दोन हजार रुपयांच्या नोटां चलनातून काढून टाकण्यात आल्या असून त्यातील 97.26 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत, मात्र अजून 9760 कोटी रुपयांच्या नोटा बँकांकडे परत आलेल्या नाहीत, अशी माहिती आरबीआयकडून आज देण्यात आली. 19 मे रोजी आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे.
चलनात असलेल्या रु. 2,000 च्या बँक नोटांचे एकूण मूल्य, 3.56 लाख कोटी रुपये होते. त्यापैकी बहुतांश नोटा परत आल्या असून अजून 9760 कोटींच्या नोटा परत येणे बाकी आहे.
देशभरातील आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये लोक 2,000 रुपयांच्या बँक नोटा जमा करू शकतात किंवा बदलू शकतात. नोटा जमा/बदली करणारी 19 आरबीआय कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत.