नवी दिल्ली – आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेसह इतर पाच बँकामधील 9.5% भागभांडवल खरेदी करण्यास एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) रिझर्व्ह बँकेने (RBI Bank) परवानगी दिली आहे. आयसीआयसीआय बँकेशिवाय अॅक्सिस बँक, सूर्योदय बँक, बंधन बँक, येस बँक आणि इंडसइंड बँकेतील भाग भांडवल आता एचडीएफसी बँकेला खरेदी करता येणार आहे.
ही भांडवल खरेदी 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येऊ शकेल असे रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला कळविले आहे. मात्र इतर बँकातील 9.5% पेक्षा जास्त भाग भांडवल एचडीएफसी बँकेला खरेदी करता येणार नाही. एचडीएफसी बँकेचे इतर बँकातील भाग भांडवल 5% पेक्षा कमी आहे. ते वाढविण्याची गरज असल्याचे एचडीएफसी बँकेने रिझर्व्ह बँकेला सादर केलेल्या अर्जात म्हटले होते.
त्यानंतर रिझर्व्ह बँकेने या अर्जावर विचार करून आता एचडीएफसी बँकेला ही परवानगी दिली आहे. गेल्या पंधरवड्यात एलआयसीला एचडीएफसी बँकेतील आपले भाग भांडवल वाढविण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली होती. तिसर्या तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या नफ्यावर आणि ठेवीवर परिणाम झाल्यानंतर या बँकेच्या शेअरचा भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मात्र आता या शेअरचा भाव स्थिरावू लागला असल्याचे दिसून येते.