नवी दिल्ली – देशात डिजिटल बँकिंगचा मोठ्या प्रमाणात केला जातो. डिजिटल बँकिंगमुळे पैश्यांची देवाणघेवाण सोप्या पद्धतीने करता येते. यामुळेच बँक खातेदार या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. भारताची मध्यवर्ती बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील या व्यवहारांना प्रोत्साहन देत असते.
अशातच रिझर्व्ह बँकेतर्फे आज एक महत्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. यानुसार काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सिस्टीम अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात NEFT सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
काय आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर(NEFT)?
एनईएफटीच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचा व्यवहार केला जाऊ शकतो. या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँके खात्यात थेट पैसे पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी दोन्ही बँक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध असणं गरजेचं आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ६ जून २०१९ रोजी आरबीआयने NEFT सेवा निशुल्क केली आहे. ही सुविधा पूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत होती. मात्र आता ही सुविधा २४ तास उपलब्ध असते.
RBI ची सूचना
एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२१ रोजीही असंच अपग्रेडशन करण्यात आलं होतं.
NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021